Breaking News

मंदिरातील दानपेटी लोणंदमधून लंपास


लोणंद / प्रतिनिधी : लोणंद गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञात चोरटयांनी भवानी माता मंदीर, महादेव मंदीर व दत्त मंदीर येथील मंदिरांची कुलुपे कोयंडे तोडून मुर्ती व दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस स्टेशनमध्ये झाली नव्हती

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की लोणंद मधील लोणंद येथील महादेव मंदिर, तुळजाभवानी व दत्त मंदिराची कुलपे व कड्या कोयंडे तोडून तुळजा भवानी मंदिरातील तुळजाभवानी काठीला असणारी अंबाबाईची पितळेची मुर्ती, शंभु महादेव मंदिरामधून पितळी अभिषेक पात्र व त्रिशूल चोरून नेले आहे तर दत्त येथील गणपतीची छोटी मुर्ती व दानपेटी फोडली असून यातील रक्कम चोरीला गेली आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस स्टेशनला करण्याचे चालले होते.