Breaking News

कृष्णा अभिमत विद्यापीठात जागतिक महिला दिन उत्साहात


कराड, (प्रतिनिधी) : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठातील महिला सक्षमीकरण विभागाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा खानविलकर, नर्सिंग अधिविभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, डॉ. अमृतकुवर जाधव आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी उरी हल्ल्‌यासह विविध सामाजिक विषयांवरील नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. डॉ. चित्रा खानविलकर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. सुजाता जाधव व सौ. अनघा कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमृतकुवर जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ.एम. व्ही. घोरपडे, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. एस. सी. काळे,डॉ. आर. सी. डोईजड उपस्थित होते.