Breaking News

आरपीआयचा एल्गार मेळावा आज पुष्कर मंगल कार्यालयात


सातारा / प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची नियोजित एल्गार सभा सातार्‍यात राजवाडा परिसरातील गांधी मैदानावर न होता विसावा नाका येथील पुष्कर मंगल कार्यालयात होणार असून कार्यकर्त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. 

शुक्रवार, दि. 15 रोजी दुपारी तीन वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड (बापू) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा एल्गार मेळावा संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे घ्यावयाच्या निर्णयांवर चर्चा व ध्येयधोरणे आखण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसमवेत या वेळी उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे.