Breaking News

कर्जतला न्यूज एजन्सीचे महिलांच्या हस्ते उद्घाटन


महिला दिनानिमित्त उपक्रम ; महिलांचा फेटे बांधून सन्मान
कर्जत/प्रतिनिधी
जागतिक महिलादिनानिमित्त कर्जत येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. अमरसिंह विद्या प्रतिष्ठानच्यावतीने समृद्ध कर्जत कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून भाऊसाहेब तोरडमल संचलित सद्गुरु न्युजपेपर एजन्सीचे उद्घाटन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका नीता कचरे, मनीषा सोनमाळी, मंगल तोरडमल, वृषाली पाटील, डॉ.कार्तिकी काळदाते, डॉ.योजना कोपनर, डॉ.शबनम इनामदार, डॉ.स्नेहा ढवळे, डॉ.सोनल जगताप, डॉ. स्नेहल कर्पे, डॉ.अमृता अनारसे, डॉ.ज्योती घालमे, डॉ. आशा गायकवाड आदी महिलांचा फेटे बांधून व नारळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभाा भैलुमे यांनी मनोगत व्यक्त केले.