Breaking News

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली पट्टा


श्रीरामपूर /प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभाग श्रीरामपूर, सेंट लुक हॉस्पीटल, साखर कामगार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग (टिबी ) दिनानिमित्त क्षयरोगमुक्तीच्याउपाययोजनांची माहिती देण्यासाठी रॅली काढली होती. यात नर्सिंग कॉलेजचे सुमारे ६५० विद्यार्थी , कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी माहितीपत्रके वाटून माहिती देण्यात आली.

या रॅलीचे उदघाटन तालुका आरोग्य तथा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहनराव शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंत जमधडे, सेंट लुक हॉस्पीटलच्या प्रमुख सिस्टर फिलोमिना, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मंगला जोशी, कामगार हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या कांचन पाथरकर आदींच्या उपस्थितीत झाले. क्षयरोग हा संसंर्गजन्य आजार त्वरीत उपचार केल्याचलगेच बरा होतो. असे डॉ.मोहनराव शिंदे यांनी सांगितले. तालुका आरोग्य विभागातील अधिकारी सुनील कुलकर्णी, पर्यवेक्षक त्रिंबक बाचल, आरोग्य सहायक आदींनी कार्यक्रम यशस्वीहोण्यासाठी परिश्रम घेतले. प्रकाश मेतकर, विनोद वाणी, शबाना खान आदींनी आभार मानले.