जामखेडमध्ये दोन गटाची परस्पर विरोधी फिर्याद


जामखेड ता/प्रतिनीधी: जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथील चंदन काळे व इतर पाच ते सहा जणाच्या विरोधात शंकर बारस्कर यांच्या फिर्यादी वरून जामखेड पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आईता काळे हिच्या फिर्यादी वरून शंकर बारस्कर व ईतर पाच ते दहा जणाविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परस्पर विरोधी फिर्यादीचा तपास जामखेड पोलिस करीत आहेत.

दि.11 मार्च रोजी सायकांळी 7 वाजता शंकर हनुमंत बारस्कर हे कामा निमीत्त चोभेवाडी परिसरातून आपल्या सहकार्य सोबत जात असताना चंदन काळे व इतर पाच ते सहा इसमानी आपल्याला आडवून जबर मारहाण केली. व आपल्या जवळील रोख रक्कम पाच हजार रूपये काढून घेतले. व संबधीत आरोपी तेथून पळवून गेले अशा आशायचे फिर्याद शंकर हनुमंत बारस्कर राहणार वाघा ता.जामखेड यांनी जामखेड पोलिस स्टेशन येथे दिले असून या फिर्यादी नुसार किरण काळे, सचिन काळे, नितीन काळे, अनिल काळे, चंदन काळे, रवि पवारसह इतर अज्ञात दोन व्यक्तीच्या विरोधात भादवि कलम 395 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान हा गुन्हा तालुक्यातील चोभेवाडी शिवारात घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. त्याच दिवशी म्हणजे दि.11 मार्च रोजी चोभेवाडी येथील चंदन काळे याची सुन आईता किरण काळे तिच्यावतीने जामखेड पोलिस स्टेशन येथे अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व कुटुंबाला समुहाने मारहाण करून राहती घरे पेटवून दिल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात शंकर बारस्कसह नितीन सगळे, बंडु सगळे, सोमा पोते, अनिल पोते, छगण काळे व इतर अज्ञात पाच ते दहा आरोपींचा समावेश असून जामखेड पोलिसाकडून दाखल करून घेण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीतील एकुण 8 ओरीपीस अटक करण्यात आली असल्याचे जामखेड पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सागितले. 

या गुंतागुतीतील केसचा तपास जामखेड पोलिस करत असून या विषयी अल्पसंख्याक पारधी समाजच्या महिलांनी आपला संताप व्यक्त करत हा जाणून बुजून अल्पसंख्याक कुंटुबावर अन्याय केला असल्याचे सांगितले. न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पुढील तपास पोलिस उपधिक्षक अरूण जगताप हे करत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget