Breaking News

पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावी अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला


जामखेड ता.प्रतिनीधी
समीर शेख

जामखेड ता.प्रतिनीधी - पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खबर देणारे पांडूरंग श्रीरंग सायगुडे वय 48 वर्ष रा सायगुडे वस्ती चौडी यांची मुलगी कु आरती पांडूरंग सायगुडे वय 17 वर्षे 8 महिने रा सायगुडे वस्ती हिस पळवून नेले बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि 171/2019 भादवि 363 प्रमाणे दि 24 रोजी दाखल झाला होता. आज रोजी खबर देणारे यांनी खबर दिली की त्यांची मुलगी मयत आरती हिचे प्रेत मिळून आले असून आज तिचे प्रेतावरील मांस प्राणी कुत्र्यांने खाल्ले आहे. ते संपुर्ण सडून दुर्गंधी सुटलेले अवस्थेत पडलेले होते, वैगरे खबरीवरून खबरी अहवाल तालुका दंडाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अवतारसिंग चव्हाण करत आहेत.

पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे.
आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना चार दिवसांपुर्वी घडली असून आज ती उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांना माहिती दिल्यानंतरही ते वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही, असे गावक-यांचे म्हणणे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक, फाॅरशिक लॅब, फिंगरप्रिंट त॔त्रज्ञ व स्वानपथक घटनास्थळी पोहोचले असून पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार घटनास्थळी हजर असून संध्याकाळी शवविच्छेदन जागेवर चालू होते; दरम्यान पोलीस तपास वेगाने सुरु असून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.