Breaking News

राशीनला दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठाचे आयोजनकर्जत/प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने राशीन येथील जगदंबा महिला सेवा मंडळाच्यावतीने दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठाचे आयोजन करण्यात आले होते. जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळपासून सुरू झालेल्या ग्रंथ वाचन व देवी मंत्र जयघोषाने मंगलमय वातावरण झाले होते. या ग्रंथ वाचनाला महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राशीन परीसरासह कर्जत, मिरजगाव भागातून महिला ग्रंथ वाचनाला आल्या होत्या. दुर्गा सप्तशती पाठाचे सरपंच मिराबाई देशमुख, हिराबाई देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा राजेभोसले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
ग्रंथ पाठ वाचनासाठी 500 महिला सामिल झाल्या होत्या. सहभागी महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला जगदंबा सेवा मंडळाच्या कुमुदिनी रेणुकर, गिता रेणुकर, अ‍ॅड.प्रतिभा रेणुकर, रोहिणी रेणुकर, सुनिता रेणुकर, अर्चना रेणुकर, छाया क्षिरसागर, अलका रेणुकर, निशा पुंडे, शोभा रेणुकर, सुषमा रेणुकर, उषा काळे, सोनाली काळे, पुजा काळे यांच्यासह दिपक क्षिरसागर, शुभम रेणुकर, अ‍ॅड.सचिन रेणुकर, विपुल रेणुकर, मयुर रेणुकर, योगेश काळे, शशिकांत टोले, अथर्व रेणुकर यांनी परीश्रम घेतले.