Breaking News

चित्रकला स्पर्धेत श्रीया प्रभुणेला नॅशनल गोल्ड मेडल


सातारा / प्रतिनिधी : इंडिया आर्ट खुला आसमान संस्थेतर्फे डिसेंबरमध्ये झालेल्या घेण्यात आलेल्या देशव्यापी चित्रकला स्पर्धेत देशातून लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रीया किरण प्रभुणे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या प्राप्त निकालानुसार 289 विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड देशपातळीवर करण्यात आली. यात तिच्या चित्राची निवड झाली आणि या चित्रांमधून फक्त आठ चित्रांची निवड गोल्ड मेडलसाठी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना देशपातळीवर गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकमेव श्रीया प्रभुणेचा समावेश आहे

श्रीयाच्या या उज्वल यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांचे शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, अनंत जोशी, डॉ. मधुसूदन मुजुमदार, शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी, दिलीप कांबळे, दिलीप रावडे, सौ लता दळवी व नीलम तिरमारे आदींनी अभिनंदन केले.