Breaking News

सिंदखेड राजा पंचायत समितीतील भाजप-राष्ट्रवादीच्या अभद्र युतीचा मुद्दा गाजणार!
सिंदखेडराजा,(प्रतिनिधी): बुलडाणा लोकसभेचा निवडणूकीची चक्रे वेगाने फिरु लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या वतीने माजी मंञी डॉ.राजेंद्र शिंगणे, शिवसेना भाजपा युतीचे विद्यामान खासदार प्रतापराव जाधव तर भारीप बहुजन वंचीत बहूजन आघाडीचे अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातील विद्यमान आमदार असे तीन उमेदवाराच्या घोषणा करण्यात आल्या असून माञ सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादीने भाजपा सोबत बस्तान बांधून मिळविलेली सत्ता हा विषय लोकसभा निवडणूक काळात गाजणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याचा दावा करत आहे एकीकडे भाजपा शिवसेना या जातीयवादी पक्ष सतेत येऊ नये म्हणून आघाड्या करून निवडणूक लढवावी यासाठी राज्य तथा राष्ट्रीय पातळीवर बैठका चर्चा सुरु आहे.

माञ आपल्या जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना 3, भाजपा 3 असे सदस्य निवडून आले माञ भाजपा व शिवसेना युती होऊन राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत नसल्यामुळे विरोधात राहिल असे सर्व जनतेला वाटत होते. परंतु जिल्हा स्तरावर असलेल्या जिल्हा परीषदेत काँग्रेस व शिवसेनेला सतेबाहेर ठेवण्यासाठी भाजपाचे तत्कालीन पालकमंञी स्व.भाऊसाहेब फुंडकर व डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गळ्यात गळा घालून जिल्हा परीषदेत युती करून काँग्रेस व शिवसेनेला सतेपासुन रोखले. सर्व जिल्ह्यातील जनतेला वाटत होते की शिवसेना भाजपाची जिल्हा परीषदेत युती होईल परंतु भाजपा राष्ट्रवादीने अभद्र युती करून जिल्हावासीयांना आश्‍चर्यचकित केले. असे असतानाच पंचायत समितीच्या निवडणूका सुद्धा सोबत असल्यामुळे सिंदखेडराजा पंचायत समितीची सुद्धा निवडणूक झाली आणि यामध्ये तोच फार्मुला वापरुन भाजपा व राष्ट्रवादीची युती होऊन शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले. मातृतीर्थातील जनतेला अशा युती मुळे चर्चेचा विषय झाला होता. अशातच आता लोकसभा निवडणूकी रणधुमाळीला सुरवात झाली असून युती व आघाडी अशी जोरदार रंगत पाहावयास मिळत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे भाजपा शिवसेना या जातीयवादी पक्षाला सतेत येऊ देऊ नका, असे आवाहन करतील माञ स्वतः च पुढाकार घेऊन सत्ता मिळवीण्यासाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पंचायत समितीत व जिल्हा परीषदेत भाजपा सोबत केलेल्या हातमिळवणीचे काय याबाबतीत जनता जाब विचारतील हे नकी!

दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव जिल्हा परीषदेमधील व सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी युतीवर बोलणार नाही असे वाटते कारण स्वतः खा.जाधव लोकसभेचे उमेदवार असल्यामुळे व भाजपा व शिवसेनेची युती यामुळे ते याबाबत ब्र शब्द काढणार नाही आसे वाटते. परंतु डॉ.राजेंद्र शिंगणे यांना जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या या अभद्र युतीचा सवाल करतील की नाही हाही प्रश्‍न आहे. परंतु लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा राष्ट्रवादी या अभद्र युतीचा विषय गाजणार हे नकीच!