नीरव मोदीचा आलिशान बंगला उद्ध्वस्तअलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांना गंडा घालून फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबाग येथील किहीम समुद्र किनार्‍याजवळील बंगला आज नियंत्रित स्फोटाने जमीनदोस्त करण्यात आला. बंगल्याच्या इमारतीला सुरूंग लावून स्फोट (कंट्रोल ब्लास्ट) करण्यात आला. मोदी फरार झाल्यानंतर हा 30 हजार चौरस फुटांचा बंगला सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतला होता. हा बंगला जिल्हाधिकार्‍यांनी अनधिकृत ठरवल्यानंतर त्यावर कारवाई करण्यासाठी तो रायगड जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला होता.
मोदीचा बंगला पाडण्यासाठी प्रशासनाने 8 मार्च ही तारीख ठरवली होती. बंगला पाडण्यासाठी विशष तांत्रिक पथक तयार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. हे पथक गेल्या दोन दिवसांपासून बंगला पाडण्यासाठी पिलरदरम्यान स्फोटके लावण्याचे काम करत होते. यापूर्वी नीरव मोदीचा बंगला पाडण्याचे काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्थगित करण्यात आले होते. हा बंगला इतका मजबूत होता, की तो पाडण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीनही असमर्थ ठरल्या होत्या.

दरम्यान, बंगला पाडण्यासाठी पोहचलेल्या टीमला इथे किंमती सामान सापडले आहे. ते सुरक्षित बाहेर काढून जप्त करण्यात आले. आता या सामानाचाही लिलाव केला जाईल. यामध्ये झुंबर आणि बाथरुममध्ये लावण्यात आलेले शॉवर यांचाही समावेश आहे. मोदीचा हा बंगला जवळपास वीस हजार चौरसफूट परिसरात पसरलेला होता.

सूर्यवंशी यांनी अलिबागच्या किहिम स्थित 58 अवैध इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यावर, ही कारवाई सुरू न करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारल्यानंतर या इमारती पाडण्याच्या आदेशांवर कारवाई सुरू झाली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget