Breaking News

दहिवडीत प्रथमच महिला दिनाचा दिमाखदार कार्यक्रम


दहिवडी/ प्रतिनिधी : शेकडो दुचाकीवर दहिवडीच्या मुख्यरस्त्यावरून स्वार होत नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या नेतृत्वाखाली रणरागिणी कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या. सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात अन हास्यकल्लोळात महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आनंद लुटला. शेवटच्या इव्हेंटपर्यंत या महिला खुर्चीत खिळून होत्या

दहिवडी ता. माण येथील कार्यक्रमात सोनिया गोरे, तहसीलदार बाई माने, जयश्री मोहने, नगराध्यक्षा साधना गुंडगे, जिल्हापरिषद सदस्या सोनाली पोळ, अधीक्षिका पांचाळ, ऍड. मीनल कुलकर्णी, डॉ. वसुधा कर्णे, नगरसेविका नलिनी काशीद, पदमा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सोनिया गोरे म्हणाल्या, पारंपारिक रूढी, परंपरा झुगारून महिलांनी रिंगण तोडून हल्लीच्या महिलांनी रिंगण पार केले आहे. गेल्या दहा वर्षापेक्षा सध्याच्या परिस्थितीमध्ये माण खटाव मधील महिलांमध्ये फार बदल पाहायला मिळत आहे. सावित्रीबाई फुले सारख्या समाज सुधारकांनी अपार कष्ट घेतल्याने महिला वर्गात बदल घडून आला, त्यांना समाजात आणण्याचे अनमोल कार्य केले.

तहसीलदार बाई माने म्हणाल्या, तुम्ही गृहिणी तर आम्ही नोकरदार आहोत मात्र एकमेकीना हेवा वाटतो. मात्र दोघींची कर्तव्य व जबाबदार्‍या एकच आहेत. आता आता महिला मागे हाटत नाहीत त्या पुरुषांपेक्षा ही चांगले काम करतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. महिला चांगल्या पिढ्या घडविण्याचे महान काम करतात. अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या यशात त्यांच्या या सहहिस्सेदार असतात कारण अधिकारी घडविण्यात त्या मातेचा मोलाचा वाटा असतो. मुलगी मुलगा यांना समान वागणूक देण आवश्यक आहे, तसेच मुलींना आपल्या आई वडिलांप्रती जितकी प्रेमाची ओढ असते तितकंच सासू सासर्याबद्दल असणे गरजेचे आहे.
सोनाली पोळ म्हणाल्या, प्रत्येक स्रीच्या पुरुषाचाही हात असतो, स्री पुरुष समान धारणा ठेवल्यास व दोन्ही समान गतीने चालल्यास स्री समाजात पुढे जाईल.

दहिवडीत प्रथमच भव्य अन दिव्य महिला दिनाचा कार्यक्रम तो यशस्वी करण्यात नगराध्यक्षा साधना गुंडगे, डॉ. वसुधा कर्णे, इंद्रायणी जवळ, रेखा पवार, वर्षा देवकर, वृषाली गोडसे, निर्मला सावंत, वैशाली पवार यांच्या टीमचा सहभाग होता. कार्यक्रम पाहून भारावून गेलेल्या तहसीलदार बाई माने यांनी या टीमचे कौतुक केले तर सोनिया गोरे यांनी महिलांची गर्दी पाहून मला सुध्दा असाच कार्यक्रम घ्यायचा आहे अशी भावना व्यक्त केली.