Breaking News

अत्याधुनिक कॅथलॅबचे उदघाटन


प्रवरानगर/प्रतिनिधी: लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नव्याने कार्यान्वित होत असलेल्या कॅथलॅब चे उदघाटन मंगळवार २ एप्रिल २०१९ रोजी सिंधुताई एकनाथराव विखे यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर यांनी दिली. या प्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज, सौ. मोनिका सावंत इनामदार, सौ. सुवर्णा ताई विखे पाटील,पुणे येथिल सुप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट व कॅथलॅबचे संचालक डॉ सुनील अग्रवाल, डॉ. अशोक अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत. 

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात येणाऱ्या कॅथलॅबमुळे हृदय विकार उपचाराकरिता शहरात जावे लागत असणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य यॊजनॆत सहभागी होणाऱ्या रुग्णांना मोफत व इतरांना अतिशय अल्प दरात उपचार केले जाणार आहेत. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर तसेच अशा रुधायशी संबंधित उपचार मिळणार असल्यामुळे रुग्णाची मोठी आर्थिक बचत होणार आहे व त्यांना तातडीने उपचारही मिळणार आहेत. अशी माहिती आहेर यांनी दिली.