Breaking News

महाशिवरात्रीला बेलवडे हवेलीत शिवलीलामृत पारायण सोहळा


पाटण,  (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीनिमित्त बेलवडे हवेली ता.कराड येथे शिवलीलामृत ग्रंथाचा पारायण सोहळा गेली 16 वर्षांपासून साजरा करण्यात येतो. यंदाही महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीपावकेश्वर महादेव मंदिर, बेलवडे हवेली दिनांक श्रीशिवलीलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण सोहळा सुरू झाला आहे.

मंगळवार, दि. पाच रोजी भव्य दिंडी सोहळा व रक्तदान शिबीर आणि दैनंदिन श्रींना अभिषेक, महारूद्र स्वाहाकार, अन्नदान, शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन, प्रवचन, किर्तन, भजन, हरिपाठ आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औंध संस्थानचे मठाधिपती दिलीप पुरी गोसावी, ओम चैतन्य धर्मपुरी, व अनंत पुरीगोसावी, त्यागयोगी श्रीकेदारनाथ महाराज, हभप पांडुरंग महाराज, बाळासाहेब चोपदार, हभप बाजीराव मामा कराडकर, वेदमुर्ती गिरीषशास्त्री वरूडकर, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिवकालीन तुतारी लोककला मंडळ, पश्चिम महाराष्ट्र, ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था-विहापूर, मायाक्का गजवाद्य- शिवडे व उंब्रज परिसर यांचेसह मान्यवर, आध्यात्मिक सेवेत उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेलवडे हवेली ग्रामस्थ व स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.