Breaking News

पुणेवाडी येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन


पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन शुभारंभ जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मंजूर झालेला पुणेवाडी ते सोबलेवाडी फाटा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत हरिजन वस्ती येथील समाजमंदिर बांधणे, दलितवस्ती रस्ता काँक्रिटिकरण करणे, पंचशिल चौक हायमास्ट दिवा लोकार्पण, बांगडा वस्ती येथे सी.डी.वर्क बांधणे, मराठी शाळा ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रस्ता कॉक्रिटीकरण करणे, अशा 50 लाखा पेक्षा जास्त विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी सुजित झावरे म्हणाले की, आजच्या काळात चालेल्या राजकीय घडामोडीनुसार राजकारण दर्जाहिन झाले आहे. आणि ते सुधारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जशी पुढार्‍यांची जबाबदारी आहे. तशी समाजाची देखील आहे. पूर्वी चांगल्या माणसाला आणि त्यांच्या शब्दांना किंमत होती. आजच्या काळात अमूलाग्र बद्दल झाला आहे. पूर्वी माणूस शब्दाला जागत होता. आता राजकारणामध्ये शब्दाला किंमत नाही व चांगल्या माणसाला ही किंमत राहिली नाही. परिस्थिती समाजासाठी घातक आहे. त्यामुळे आजच्या राजकारणामध्ये शुध्दीकरण होणे आवश्यक आहे. समाजामध्ये जो माणसाच्या सुख, दु:खामध्ये राहतो. समाजामध्ये निस्वार्थपणे काम करतो. असे विकासकामे करणार्‍या माणसाच्या पाठीमागे जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

यावेळी पुणेवाडी येथील भैरवनाथ गोशालामधील जनावरांसाठी सुजित झावरे यांनी स्वखर्चाने चारा वाटप केले. कार्यक्रमासाठी दिलीपराव ठुबे, गंगाराम बेलकर, अरुणराव ठाणगे, अमोल साळवे, पोपटराव शेटे, शिवाजी औटी, लहु भालेकर, सुभाष बेलोटे, गोकुळ वाळुंज, दिपक नाईक, पोपट झंजाड, सतीश पिंपरकर, बाळासाहेब बोरुडे, प्रदीप गाडे, बाळासाहेब रेपाळे (सरपंच), सुहास पुजारी, भास्करराव पोटे, मा.सरपंच, कोंडीभाऊ रेपाळे, बाबाजी पोटे, बन्सी रेपाळे, पाराजी रेपाळे, सिताराम पुजारी उपस्थित होते.