भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दाऊदला फुटला घाम


नवीदिल्लीः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरून गेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात दडून बसलेला भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमलाही घाम फुटला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून दाऊद प्रचंड घाबरला आहे.

भारतातू पळून गेल्यानंतर दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय ही दाऊदला पूर्ण संरक्षण पुरवत असते. तो कराचीतल्या सैन्याधिकारी राहत असलेल्या भागात राहतो. हा अतिशय पॉश भाग असून लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय त्या भागात राहात असल्याने तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे; मात्र भारताच्या हवाई हल्ल्यानंतर त्याला आपल्या जीवाची भीती वाटते आहे. आयएसआय दाऊदचे ठिकाण कधीही बदलवू शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात राहून दाऊद आपला व्यवसाय चालवतो आणि गुन्हेगारी टोळीवर नियंत्रणही ठेवत असतो. आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये दाऊदचा व्यवसाय पसरलेला आहे.

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तो भारतातून दुबई आणि नंतर पाकिस्तानात पळून गेला होता. त्यानंतर तो आपल्या हस्तकांमार्फेत सर्व गोष्टी करत असतो. भारताची रॉ ही गुप्तचर संस्था दाऊदच्या मागावर असून त्याला अमेरिकेनेही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget