Breaking News

डांबरीकरण कामाचे नगराध्यक्षा संगिता बर्डे यांच्या हस्ते भुमिपूजन


नेवासे/प्रतिनिधी : आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नातून नेवासे शहरातील 59 लाख रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा संगिता बर्डे यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

नेवासे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये येणारा डॉ. हेडगेवार चौक, मारुती मंदिर चौक ते जुन्या पेठेपासून गणपती मंदिर असा सुमारे 16 लक्ष रुपये खर्चाचा डांबरीकरण भूमीपूजन करण्यात आले. या ठिकाणी अंतर्गत भुयारी गटारी अगोदरच करण्यात आलेल्या आहेत तर दुसरा डांबरीकरण रस्ता हा डॉ.हेडगेवार चौक ते नुराणी मस्जिद-अ‍ॅड.एम.आय. पठाण यांचे घर 43 लाख रुपये खर्चाचा असून या दोन्ही रस्त्याचे कामाचे शुभारंभ महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्षा संगिता बर्डे, दत्तात्रय बर्डे, पंडित वाघ, मौलाना युन्नूसभाई, बाळासाहेब वाघ, शरीफ शेख, गंगाधर भगत मामा, दत्तात्रय बर्डे, भाजपचे नगरसेवक सचिन नागपुरे, डॉ.सचिन सांगळे, दिनेश व्यवहारे, भारत डोकडे, रणजित सोनवणे, राजेंद्र मापारी, नगरसेविका सीमा मापारी, सतीश गायके, प्रकाश गुजराथी, मुक्तार शेख, असिर पठाण, रहेमान पिंजारी, विवेक नन्नवरे, हारूण जहागीरदार, संतोष ओस्तवाल, स्वप्नील मापारी, भास्करराव कणगरे उपस्थित होते. 

यावेळी मारुती चौकात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेविका मापारी यांनी केले.
यावेळी रमेश ओस्तवाल,राजेंद्र मुथ्था,मौलाना शरीफभाई शेख,ऐजाज पटेल,राजेंद्र कदम,शिवाजी गायकवाड यांनी याप्रसंगी शहराच्या विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी दोन्हीही परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.