Breaking News

उमेदवारीसाठी काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळा आणतात -डॉ. विखे


कान्हूर पठार/प्रतिनिधी: दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक महत्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. व जिरायत भागातील शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज दिल्लीत जावा यासाठी आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. राजकीय पक्षांना आपण उमेदवारीसाठी विनंती केली. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळा आणत आहेत. मात्र, हे लोक एखाद्या चांगल्या उमेदवारांना का विरोध करत आहेत. याचे कोडे आजपर्यंत मला उलगडलेलं नाही. त्यांनी केलेल्या विरोधाची सल माझ्या मनात जरूर आहे. 

परंतु याच विरोधामुळे माझे मनोबल आणखीन वाढले आहे. आणि लोकसभा उमेदवारीचा माझा निश्‍चय दृढ झाला आहे. असे प्रतिपादन डॉ. विखे यांनी केले. पारनेर येथे डॉ. बबनराव सोबले यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.

माझी लोकसभेची उमेदवारी ही मला काही मिळवायचेय यासाठी नसून माझे आजोबा पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांवर आयुष्यभर निष्ठा असनार्‍या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यकर्त्यांना उद्देशुन त्यांनी सांगितले की, पक्ष कुठला असेल किंवा चिन्ह काय असेल हे जरी निश्‍चित नसलं तरी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून डॉ.सुजय विखे पाटील निश्‍चित उमेदवार राहतील याबद्दल कसलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. ते असेही यावेळी म्हणाले. याप्रसंगी सिताराम खिलारी, राहुल झावरे, राहुल शिंदे, किरण ठुबे, डॉ सय्यद यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.