Breaking News

जिल्हा न्यायालयात महिला दिनी नारी शक्तीचा जागर


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील जिल्हा न्यायालयात महिला दिनी न्यायालयातील महिला न्यायाधीश, वकील आणि कर्मचार्‍यांनी महिलांवरील अन्याय अत्याचाराला मूठमाती देत तो झुगारून कसा लावायचा यावर आधारित ’बोलती बंद’ ही लघुनाटिका सादर करीत नारी शक्तीचा जागर केला.

प्रधान जिल्हा न्यायधीश कमलाकर कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन दिवाणी न्यायधीश टी. एम. देशमुख-नाईक यांनी केले होते. त्यांना दिग्दर्शनात अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी सहाय्य केले. या लघुनाटिकेत अ‍ॅड. वृषाली तांदळे, अ‍ॅड. अनिता दिघे, सरकारी वकील मनीषा शिंदे, अ‍ॅड. रिजवाना शेख, अ‍ॅड. उमा कुलकर्णी, अ‍ॅड. पल्लवी बारटक्के, अ‍ॅड. स्वाती पाटील, अ‍ॅड. निरुपमा काकडे, कर्मचारी स्नेहल पवार, यांनी भूमिका केल्या. न्यायालयीन पियुष उपाध्ये यांनी ढोलकी वादन केले तर रतन येणारे यांनी ध्वनीसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

या लघुनाटिकेत कौटुंबिक हिंसाचार, बाल लैंगिक शोषण, मुलींची छेडछाड, कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे शोषण या विषयांबाबत विविध प्रसंगांमधून जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधिश न्या. व्ही. व्ही. बांबर्डे, न्या. एम. व्ही. देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.शेखर दरंदले, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष जे.बी. भापकर, न्या.पी.पी.बनकर, न्या. के.के. पाटील, न्या. के. व्ही. बोरा, न्या. श्रीमती व्ही.सी. देशपांडे आदी उपस्थित होते.