Breaking News

भाजपमध्ये आडवाणी, जोशींच्या नशिबी उपेक्षाच


नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे भीष्माचार्य समजले जाणार्‍या लालकृष्ण अडवाणी यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट नाकारल्यावर आता भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आडवाणी आणि जोशी यांचे नावे वगळण्यात आली आहे. 

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही या ज्येष्ठांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सध्याची स्थिती पहाता भाजप नेतृत्वाने या ज्येष्ठांना आत घरीच बसा असा संदेश यातून दिला, हे स्पष्ट आहे. भाजपने उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूकीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात 40 जणांचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती हे ही स्टार प्रचारक असणार आहेत. मात्र, जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा यात समावेश नाही. या आधी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीतही या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

भाजपचे मुरली मनोहर जोशी यांची उमेदवारी नाकारल्यानंतर, त्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांना या बद्दल सांगण्यात आले ते सरचिटणीस रामलाल यांचेकडून. मुरली मनोहर जोशी यांचे कानपुर मधून तिकीट नाकारले असून त्यानंतर त्यांनी कानपूरच्या मतदारांसाठी पत्र लिहिले आहे. हे पात्र आज सकाळपासून समाज माध्यमात व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे कि भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनी कानपुर किंवा अन्य मतदारसंघातून निवडणूक लढू नये असे सांगितले आहे. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुरली मनोहर जोशी यांना पार्टीचे सरचिटणीस रामलाल यांनी पक्ष कार्यालयात येऊन, ‘ मी कानपुर मधून निवडणूक लढविणार नाही असे जाहीर करण्यास सांगितले. मात्र दुखावलेल्या मुरली मनोहर जोशी यांनी असे न करता मतदारांना पत्र लिहिणे पसंत केले. 

मुरली मनोहर जोशी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना हा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सांगितला जाणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने ते दुखावले गेले. भारतीय जनता पार्टी ला वाढविण्यात आणि लोकप्रियता मिळवून देण्यात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. मात्र 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या जेष्ठांना मार्गदर्शक मंडळात टाकण्यात आले होते. अति ज्येष्ठांना तिकीट द्यायचे नाही असे कारण त्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर सत्ता येऊनही राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून हे नेते दूरच राहिले होते.

जोशी यांचे व्हायरल पत्र
भाजपने मुरली मनोहर जोशी यांची उमेदवारी डावलल्यानंतर, जोशी यांनी असे न करता मतदारांना पत्र लिहिणे पसंत केले. मुरली मनोहर जोशी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना हा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सांगितला जाने अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने ते दुखावले गेले. निर्णय अधिकृत घोषित करण्याआधीच मुरली मनोहर यांचे पत्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.