Breaking News

आदर्श महिला अधिकारी पुरस्काराचा आज सोहळा


सातारा,  (प्रतिनिधी) :  जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत नेहरु युवा केंद्र, सातारा व रिदम कला व साहित्य अकादमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये सामाजिक हितासाठी अधिकारी पातळीवर कार्यरत आसनारे व ज्यांना याआधी कोणताही पुरस्कार मिळाला नाही. अशा महिलांना येथील श्री शाहु कला मंदिर सातारा येथे शुक्रवार, दि. एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता आदर्श महिला अधिकारी पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे.सहायक पोलीस निरीक्षक वृषाली पाटील, पुष्पा किर्दत, शिवाजी विद्यापीठ शाहु संगह्रालयाच्या कमिटी सदस्य स्वरूपा पोरे,  जिल्हा दक्षता समन्वय समितीच्या सदस्या डॉ. नीता यादव, यशवंतराव चव्हाण सोशल वर्क स्कुलच्या प्राचार्या डॉ. शाली जोसेफ, रिदम्‌ कला व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा सुमन सोनावणे यांना यंदाचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी पुलवामातील सीरपीएफच्या शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली जाणार आहे. तसेच स्त्रीभूण हत्या, छत्रपती संभाजी महाराज जीवनकार्य व देशभक्तीपर गितांवर आधारीत नृत्य, गायनाचे कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच रिदम कला व साहित्य अकादमीच्य उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मुलींचाही सत्कार केला जाणार आहे.या कार्यक्रमास उपस्थीत रहावे असे अवाहन अकादमीचे अध्यक्ष महेश सोनावणे यांनी केले आहे.