जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बेदाडे कुटुंबीयांना आर्थिक मदत


साखरखेर्डा,(प्रतिनिधी):  येथील वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारा युवक बसवेश्‍वर जानकिरामआप्पा बेदाडे यांचा 22 फेब्रुवारी रोजी काविळीच्या आजाराने मृत्यू झाला. अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना या परिवाराचा आधार गेल्याने झालेली परिवाराची अपरिमित हानी भरून निघू शकत नाही. बेदाडे यांच्या कुटुंबीयाला या बेताच्या परिस्थितीतून सावरण्या करता जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून आज 12 मार्च रोजी आर्थिक मदत करण्यात आली.

बसवेश्‍वर बेदाडे यांच्या निधना नंतर त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचे आवाहन जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला वृत्तपत्र विक्रेत्यांनी जमेल तेवढी रक्कम जमा केली. दरम्यान 20 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जमा झाल्यानंतर 12 मार्च रोजी येथील विदर्भ न्याय कार्यालयात कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली. यावेळी सरपंच महेंद्र पाटील, चिखली अर्बन बँकेचे संचालक विश्‍वनाथ आप्पा जितकर, नारायण खरात यांच्या उपस्थितीत जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजीव टिकार, राजेश तायडे, प्रकाश उन्हाळे, दत्ता उमाळे, ज्ञानेश्‍वर इंगळे, सुंदर चौधरी, राहुल डिडोळकर, अशोक सोनवणे, यांच्या हस्ते शिला बसवेश्‍वर बेंदाडे यांची कन्या भूमिकाच्या नावे बँकेत एफडीआर करून सदर एफडीआर सुपूर्द करण्यात आला. यावेळी सरपंच महेंद्र पाटील यांनीही यावेळी या कुटुंबीयाला रोख मदत केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget