Breaking News

त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास-दळवी


संगमनेर / प्रतिनिधी: लोकसहभाग, लोकवर्गणी, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोणत्याही गावाचा सर्वांगिण विकास सहज शक्य आहे असे प्रतिपादन चंद्रकांत दळवी ( माजी विभागीय आयुक्त पुणे विभाग ) यांनीकेले.

रविवारी (२४ मार्च) अहमदनगर जिल्ह्यातील अनिवासी भारतीय व्हायस प्रिसिडेंट ग्लोबल इन्फोटेक सोल्युशन प्रा.लि. कंपनी व जयहिंद लोकचळवळ यांद्वारे आदर्श गाव निढळ अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीमार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्या सोबत सगंमनेर तालुक्यातील चार - पाच गावातील 50 ते 55 सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ हे निढळ गावची पहाणी करण्यासाठी आले होते.

दळवी यांनी यावेळी सन 1983 ते 2019 चा संपूर्ण प्रवास ग्रामविकासाची प्रक्रीया, शुभारंभ, नोकरवर्ग व व्यवसायिक संघटनेची बांधणी /स्थापना गावातील सर्व ग्रामस्थांची,संघटनात्मक बांधणी कशा प्रकारे करता येऊ शकते आणिगावाचा सर्वांगिण विकास कसा साधता येतो या विषयांवर थोडक्यात प्राथमिक माहीती दिली.