Breaking News

स्वयंभू युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित ‘नातं रक्ताचं’ उपक्रमांतर्गत रक्तदानाच्या 5 व्या महापर्वानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन करून महिला दिनानिमित्त वंचित महिलांचे स्वागत करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य आर.जी.कोल्हे होते. याप्रसंगी सिव्हील सर्जन डॉ. मुरंबी कर, डॉ.चाबुकस्वार, डॉ. पारधे , डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ.सुमैया खान, अमर चिखले, प्रमिला गोरडे, ऋषिकेश काळे उपस्थित होते.