Breaking News

मसूद अझहरला काळ्या यादीत टाका; अमेरिकेचा पुन्हा एकदा प्रस्ताव

Image result for अमेरिका

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत सादर केला आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटनने पाठिंबा दर्शवला आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु होते.

याअगोदर 27 फेब्रुवारी रोजी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अल कायदा समितीपुढे मांडला होता. परंतु, या प्रस्तावावर चीनने अडकाठी आणली होती. त्यामुळे मसूदचे नाव काळ्या यादीत गेले नाही. आता मात्र पुन्हा अमेरिकेने असा प्रस्ताव मांडला आहे.

 या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे. 14 फेब्रुवारी 2018 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात केंद्रिय राखीव दलाचे 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला झाल्यानंतर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय हालचालींना मोठा वेग आला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघटनेत मसूदचे नाव काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव टाकला होता. परंतु, चीनने नकार दिला होता. आता पुन्हा अमेरिकेने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर चीनची भूमिका काय असेल, हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.