Breaking News

विद्यार्थ्यांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद


टिळकनगर/वार्ताहर: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान, विज्ञानाबरोबर वेगवेगळ्या वनस्पती आणि पक्षाची माहिती जाणून घेतली.

शाळेच्या वतीने शुक्रवारी बेलापूर, श्रीरामपूर जवळील परिसरात विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काढण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी सहलीचा मनःपूर्वक आनंद लुटला.