Breaking News

लोणंदमध्ये नदी खोलीकरणास प्रारंभलोणंद /प्रतिनिधी : येथील बहुचर्चि खेमावती नदीपात्राच्या स्वच्छता व खोलीकरणाचा शुभारंभ खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून लोणंदकरांना खेमावती नदीपात्राच्या अवतीभवती वाढलेल्या झाडा झुडपांसोबत साचलेला कचरा कधी हटवला जाणार याची आस लागली होती. त्यासाठीच खेमावती स्वच्छता अभियान हे लोणंदकरांच्या सहभागातून जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येऊन झाडाझुडपे व कचरा हटवण्यात आला. त्यानंंतर नव्याने खोलीकरणासाठीचा उपक्रम हाती घेण्यात आला. या कामासाठी खा. शरद पवार यांनी बारामती ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे कोणतेही शुल्क न आकारता पोकलेन व जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले आहे. तसेच लोणंदमधील काही दानशूर व्यक्तींनीही मोफत डिझेल उपलब्ध करून दिले आहे.
नगरपंचायत लोणंद व लोकसहभागातून होणार्‍या या कामासाठी आमदार मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात खंडाळा तहसिलदार व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी सिंघल यांनी या कामासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्र्वासन देऊन तसे आदेश प्रशासनाकडून दिले.
या कार्यक्रमात तहसीलदार दशरथ काळे, नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील उपनगराध्यक्ष किरण पवार, डॉ. नितीन सावंत, सभापती लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक योगेश क्षीरसागर, विनोद क्षीरसागर, सुभाषराव घाडगे, विकास केदारी, भिकुदादा कुरणे, रवींद्र क्षीरसागर, दशरथ जाधव, शिवाजीराव शेळके, भरत शेळके, विठ्ठल शेळके, गणीभाई कछी, जेष्ठ पत्रकार शंकरराव जाधव, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, काशिनाथ शेळके, संतोष शिंदे, वसंतराव पेटकर, सत्वशील शेळके, रामदास शेळके, सुनिल शहा, प्रसन्न शहा, जनार्दन क्षीरसागर, विठ्ठल टेंगले, गौरव फाळके, अक्षय कुरणे, तलाठी लावंड, खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.