Breaking News

अखेर उदयनराजे- शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन

Image result for उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले


सातारा, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या एकत्रित येवून मनोमिलनाचा प्रयत्नात असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातअखेर मनोमिलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला. त्यामुळं राष्ट्रवादीची मोठी डोकेदुखी कमी झाली असून लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले आहेत.

उदयनराजे आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष पहायला मिळाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रराजे या दोघांच्यातील मनोमिलन संपुष्टात आले होते. तेव्हापासून दोघांमध्ये जोरदार राजकीय संघर्षही पहायला मिळाला. त्यातूनच राष्ट्रवादीच्या मोठ्या गटानं लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचं काम न करण्याचानिर्णय घेतला होता. पक्षश्रेष्ठींनाही तसं कळवण्यात आलं होतं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा साताऱ्याचा उमेदवार ठरता ठरत नव्हता.

अनेकदा बैठका होऊनही राष्ट्रवादीनं उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे पक्ष व स्थानिक नेते यांच्यातील वाद केव्हा संपुष्टात येणार याकडे कार्यकर्तेच्या लक्ष लागून राहिले होते. त्यातच उदयनराजे मुख्यमंत्र्यांची स्तुती करत, त्यांनी भाजपशी जवळीकही वाढवली होती. त्यामुळं राष्ट्रवादीही सावध झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील हक्काची जागाहातातून जाऊ नये म्हणून अखेर शरद पवार यांनी साताऱ्यातील वाद लक्ष घालण्याचं ठरवलं. त्यानुसार आज मुंबईत साताऱ्याच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.दोन्ही राजेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेअंती पक्षातील वादावर पडदा टाकण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहितीदिली.