Breaking News

आखेगाव येथे वैशिष्ट्यपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह


वरुर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी, शास्त्रमान्य संस्कार व शुद्ध वारकरी तत्त्वांची जोपासना करणारा वैशिष्ट्यपूर्ण सप्ताह सद्गुरु जोग महाराज संस्कार केंद्र आखेगाव येथे ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वडीलधार्‍यांचा अनादर करणारी स्वच्छंदी स्वैर तरुणाई निर्माण होत आहे. समाज संत विचारापासून दूर चाललेला आहे. 

तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. कुटुंब व्यवस्था उद्धवस्त होत चाललेली आहे. ग्राम संस्कृती लोप पावत आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेम रुजवण्याची गरज आहे. संस्कृतीच्या नावाखाली विकृतीचे स्तोम माजले आहे. कौटुंबिक मुल्ये हरवत चाललेली आहेत. वेदमान्य विचारांचा मागोवा घेण्याची गरज आहे. या व अशा वर्तमान परिस्थितीतील ज्वलंत समस्येवर भाष्य करणार्‍या समाज प्रबोधनकारांची सध्या कमी नाही. सामाजिक समस्यांवर विनोदप्रचुर शैलीतून टीका केली की वक्त्याला भरपूर टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. या हेतूने उपरोक्त कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत असतो. असे संयोजक मार्गदर्शक ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के यांनी सांगितले.