Breaking News

लिव्हिंग विसड्म स्कूल विद्यालयात पक्षी संवर्धन उपक्रम


निघोज/प्रतिनिधी: लिव्हिंग विसड्म स्कूल जवळा या विद्यालयात पक्षी संवर्धन या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याचे भांडे ठेवून एक ओंजळ पाणी व एक मूठ धान्य ठेवले. सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पक्ष्यांना धान्य व पाणी पुरवठा करण्यात आला. हा उपक्रम प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात राबवण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात पडलेल्या प्रचंड दुष्काळी परिस्थितीची झळ वन्य पशू, पक्षी व वृक्ष यांनाही बसत आहे. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर रासकर यांनी उपस्थीतांना विनंती केली की, आपणही या निसर्गाचे देणे लागतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या घरा शेजारी, परसात किंवा इतर ठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य व पाणी ठेवून या धगधगत्या उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांचे संवर्धन करू शकता. एक ओंजळ पाणी व एक मूठ धान्य असे मिळवून निसर्ग संवर्धनाचे वाचण्याचा प्रयत्न करू. कवीवर्य संदिप राठोड यांनी त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या शापीत नार, सूर्याची किनार अशा अनेक नारी शक्तीचा गौरव करणार्‍या कवितांचे वाचन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी शाळचे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर रासकर, कवी संदिप राठोड, अप्पासाहेब वराळ पाटील, पञकार संघाचे सदस्य आनंद भुकन, संदिप लोखंडे, ज्योती लोखंडे, सुषमा आवारी, मनिषा शितोळे, तृप्ती आढाव, रुपाली रत्नपारखी, वंदना म्हस्के आदी उपस्थीत होते. पक्षी संवर्धन जबाबदारी शाळेने घेतल्याबद्दल तसेच यावर प्रबोधन करुण पक्षी संवर्धनासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत प्रवृत्त केल्याबद्दल ग्रामस्थांनी शाळेच्या शिक्षकांचे कौतूक केले आहेत