Breaking News

खरवंडी कासार येथे लसीकरण मोहीम यशस्वी


खरवंडी कासार/प्रतिनिधी
खरवंडी कासार येथे राष्टीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागाच्यावतीने पल्स पोलिओ अभियान खरवंडी कासार येथे राबवण्यात आले.

हे अभियान खरवंडी प्राथमीक आरोग्य केंद्राच्यावतीने आयोजीत केले होते. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शंभर टक्के बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात आले. पल्स पोलिओ अभियान यशस्वी करण्यासाठी परीसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. तसेच खरवंडी प्राथमीक केंद्र आरोग्य विभागाची गाडी पोलिओची माहीती देण्यासाठी तीन दिवस परीसरात जनजागृती करत होती. दो बुंद जिंदगी के या जनजागृती मोहीमेमुळे परीसरात एकही बालक विकलांग होणार नाही.

याची काळजी आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. संदीप बटुळे यांनी दिली. सुनील खेडकर यांनी आरोग्य विभाग व खरवंडी प्राथमीक केंद्र विविध उपक्रम राबवून परीसरातील नागरीकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.