Breaking News

लोकसभा लढविण्यापूर्वीच हार्दीक पटेल पराभूत


गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते आणि अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दीक पटेल यांना गुजरात उच्च न्यायालयाने जबर दणका दिला आहे. पटेल यांना 2015 मध्ये मेहसाना जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याने दोषी प्रकरणाला स्थगिती देण्यात यावी यासाठी पटेल यांनी याचिका दाखल केली होती. ती याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीतून हार्दीक पटेल यांचा पत्ता कट झाला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधी कायदा 1951 अन्वये पटेल यांना दोषी ठरवत याचिका मागे घेण्याची विनंती फेटाळून लावली. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकारनेही पटेल यांच्या नाव मागे घेण्याच्या याचिकेला विरोध केला होता. लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याने हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याने स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती.