Breaking News

श्रीगोंदे तहसील कार्यालयसमोर संघर्ष क्रांती संघटनेचे आंदोलन


श्रीगोंदे/प्रतिनिधी :तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने विना कायास
कुकडी प्रकल्पाचे आवर्तन ताबडतोब सोडण्यात यावे. चारा छावण्या चारा डेपो सुरू करावे, या मागणीसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयसमोर संघर्ष क्रांती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रशांत दरेकर, दिलीपराव शिंदे, संदीप खामकर, भाऊसाहेब काळे, शांताराम भुजबळ, मुक्ताजी जाधव, सरपंच बाळा साहेब शिंदे, अशोक दरेकर, संदीप दरेकर, भालेराव नाना, हनुमंत गिरमकर, रणजित मस्के, कांतिलाल भुजबळ, चिमाजी दरेकर सहभागी झाले होते. तर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, मनोहर पोटे, बाळासाहेब गिरमकार, ऋषिकेश गायकवाड, नंदकुमार कोकाटे, सुदाम नवले व शेतकरी संघटनेने भेट देऊन पाठिंबा दिला. वडाळी पारगाव, देउळगाव श्रीगोंदे शहर आढळगाव, हिरडगाव, कोकणगाव चांडगाव भावडी या परिसरातून कार्यकर्ते उपस्थित होते.


या आंदोलनास तहसीलदार महेंद्र माळी महाजन व कोकणी प्रकल्पाचे उप अभियंता सोळंकी यांनी भेट देऊन 2 मार्च रोजी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केल्याने आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन तात्पुरते थांबविले असून 2 मार्च रोजी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याचा निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे संघर्ष क्रांती क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिला आहे.