Breaking News

चारा छावण्यासाठी कोळगावला सर्वपक्षीय रास्ता रोको


कोळगाव/प्रतिनिधी: चारा छावण्या तातडीने सुरू करण्यासाठी तालुक्यातील कोळगाव येथे सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.2 मार्च रोजी कोळगाव फाटा येथे करण्यात आले. आंदोलन सुमारे 2 तास सुरु होते.

यावेळी बाळासाहेब नलगे यांनी सांगितले की, राज्य शासनाने छावणीसाठी लावलेले निकश चुकीचे आहेत. त्यामुळे चारा छावणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. 1 हजार पेक्षा जास्त जनावरे असलेल्या गावांमध्ये किमान दोन चारा छावण्या मंजूर करण्यात याव्यात. मौजे कोळगाव येथे सुमारे आठ हजार जनावरे आहेत. व चारा छावण्यासाठी 10 प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. ते सर्व प्रस्ताव एकाच वेळी मंजूर करण्यात यावेत. एकाच वेळी सर्व प्रस्ताव शासनाने मंजूर कराव्यात तसे न केल्यास चारा छावण्या सुरु करण्यास अंनत अडचणी येत आहेत. असे त्यांनी सांगितले. व त्याचे निवेदन शासनाच्यावतीने नायब तहसीलदार संजय जगताप यांनी स्वीकारले.

 हे आंदोलन यशस्वी होण्याकरिता माजी सरपंच हेमंत नलगे, सुधीर लगड व प्रशांत नलगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सेवा सोसायटीचे मा.चेअरमन विजय नलगे, ह.भ.प.बाबा महाराज झेंडे, भाजप नेते संतोष लगड, काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब मोहरे, ग्रा. सदस्य अमित लगड, कोळगाव सोसायटीचे चेअरमन डी. एल. लगड,आबासाहेब लगड, जिल्हा खरेदी विक्री संघाचे दादासाहेब साबळे, नितीन डूबल, कुकडी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन विश्‍वास थोरात, संतोष मेहेत्रे, विनायक लगड, मंडलाधिकारी दिगंबर दहाळे, कामगार तलाठी रवींद्र बेल्हेकर यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.