Breaking News

कुकडी आवर्तनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क-पाचपुते अँकर वापरणे


श्रीगोंदे/ प्रतिनिधी

कुकडी प्रकल्पातून आवर्तन मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील तालुक्यांची पाण्याअभावी झालेली अवस्था त्यांच्या निदर्शनासआणून दिली आहे. कुकडी प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सतत संपर्कात राहून आवर्तन सोडण्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे कुकडीचे आवर्तन लवकरच सुटणार असल्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बाळासाहेब महाडिक, विक्रमसिंह पाचपुते, राजेंद्र उकांडे आदी उपस्थित होते.

कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियामक मंडळाची बैठक 2 मार्च रोजी झाली असून त्या बैठकीत 15 एप्रिलला कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय झाला होता. परंतु लाभक्षेत्रातील तालुक्यातदुष्काळाची प्रचंड झळ बसली असल्याने कुकडीचे आवर्तन 15 एप्रिल ऐवजी एक किंवा दोन एप्रिल ला सोडण्यात यावे यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसव कुकडे प्रकल्पाचे अधिकारी यांच्याशी सतत संपर्क प्रयत्न केल्यामुळे माणिकडोह धरणातील पाणी येडगाव धरणात सोडले.