Breaking News

हंदवाडात पाच जवान हुतात्मा; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान


श्रीनगरः हंदवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 72 तासांपासून सुरू असलेली चकमक अखेर आज (दि.3) संपली. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले; मात्र आपले 5 जवानही हुतात्मा झाले. तसेच शाम नारायणसिंह यादव हा उत्तर प्रदेशातील जवान यांत गंभीर जखमी झाला आहे.
चकमकीत ठार करण्यात आलेल्या दोनही दहशतवाद्यांचे मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांना सापडले आहेत; मात्र त्यांनी ओळख आणि ते कुठल्या दहशतवादी गटाशी संबंधित आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्याजवळून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात ही चकमक सुरू असल्याने सुरक्षा रक्षकांसमोर हे मोठे आव्हान होते. दरम्यान, एका स्थानिक नागरिकाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे तीन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत.

गुरुवारी रात्री उशिरा ही ही चकमक सुरू झाली होती. सुरक्षा रक्षकांनी हंदवाडातील बाबगंड आणि क्रालगंड भागात घेराव घातल्यानंतर आज तिसर्‍या दिवशीही ही चकमक सुरू होती. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री एका केंद्रीय राखीव दलाच्या अधिकार्‍यासह चार सुरक्षा रक्षक हुतात्मा झाले होते. तसेच शुक्रवारी या चकमकीत काही नागरिकही गोळ्या लागल्याने जखमी झाले होते.