Breaking News

रामदास दहिफळे यांना 'उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार'


पाथर्डी/प्रतिनिधी

पाथर्डी तालुका क्रीडा समितीचे तालुकाध्यक्ष तथा रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहटे येथील क्रीडा शिक्षक रामदास दहिफळे यांना नुकतेच उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कारानेनाशिक येथे गौरविण्यात आले.यावेळी मोहटे ग्रामस्थांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यकारी अभियंता मेरी संतोष भोसले,नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे,नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह विविधमान्यवरांच्या हस्ते क्रीडा शिक्षक रामदास दहिफळे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी मोहटे गावातील सरपंच आसाराम दहिफळे,मोहटादेवी संस्थानचे विश्वस्त रामदास पालवे,सेवासोसायटीचे अध्यक्ष भिमराव पालवे,रेणुका विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब दहिफळे,रामकिसन फुंदे,विक्रम दहिफळे,मारुती दहिफळे,अर्जुन दहिफळे,देविदास दहिफळे, श्रीधर दहिफळे,संजयदहिफळे,अंबादास दहिफळे,महादेव दहिफळे,रामकिसन दहिफळे आदी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. या पुराकर्रबद्दल त्यांचे श्री जगदंबा देवीसार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष,विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी अभिनंदन केले.