Breaking News

त्रिदिनात्मक सोहळा उत्साहात


नेवासे फाटा /प्रातिनिधी: तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथील महाशिवरात्री निमित्ताने आयोजित त्रिदिनात्मक सोहळा उत्साहात पार पडला. श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवकथाकार महंत गजानन दादा शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने व महंत बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते काल्याच्या दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी लक्ष्मण व नागेश भवार यांच्या हस्ते महंत बालब्रम्हचारी महाराज व गजानन दादा शास्त्री यांचे संतापूजन करण्यात आले. यावेळी हभप चंद्रकांत पटारे,महंत मच्छिंद्र बाबा पठाडे,हभप अशोक पांडव,वसंतराव डावखर, शांतवन खंडागळे, गंगाधर रासने, महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.