Breaking News

नेहरू युवा केंद्राव्दारा ‘संकल्प से सिध्दी तक’ जागृकता अभियान कार्यक्रम


बुलडाणा,(प्रतिनिधी): भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया
अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा 14 मार्च रोजी कृषि
विज्ञान केंद्र बुलडाणा येथे संकल्प से सिध्दी तक जागृकता अभियान
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विकास
बाहेकर, दिपस्तंभचे डॉ.नितीन जाधव, खामगांव येथिल तरुणाई फाऊंडेशनचे
मंन्जीतसिंह शिख, जळगांवजामोद येथिल अकादमीचे सचिन वारुळकार, प्रा.हरिश
साखरे, डॉ. अविनाश गेडाम हे होते.

आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ.विकास बाहेकर यांनी युवकांना सांगितले की,
संकल्प करतांना आधी स्वत:ला ओळखा, आपल्यामध्ये जो सदगुण दडलेला आहे,
त्याची ओळख आपल्याला व्हावी. त्यासाठी आत्मपरिक्षण करा, आपल्यातील
दुर्गण व वाईट सवयी काढून टाका. सकारात्कम विचार करा, स्वत:मध्ये बदल करा
आणि वास्तवाचे भान ठेवा असे आवाहन केले. युवकांनी अथक परिश्रम केल्यास फळ
नक्कीच चांगले मिळेल. पुर्वी घर छोटे होते पण सर्वांना स्विकारच्याचा
विचार होता, आता घर मोठे झालेत पण एकमेकाला स्विकारण्याची प्रवृत्ती
राहिलेली नाही. असेही त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आपल्या
मार्गदर्शनात म्हणले की, युवकांनी अष्टवधानी असावे, नोकरीच्या मागे
धावतांना लक्ष कोणतेही असो आनंदापेक्षा मोठे काही नाही याचे भान असणे
आवश्यक आहे. असे सांगून लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी निर्भिडपणे
मतदान करावे, सविंधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे.
मतदानापासून कोणीही वंचीत राहू नये याकरीता युवकांनी जनजागृती करावी असे
आवाहन केले.

तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक मन्जीतभाई सिख यांनी या समाजाचे आपणास काही
देणे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी संम्पतीची आवश्यकता नाही. सम्पतीतुन
आनंद मिळवता येणार नाही म्हणून ज्या सत्कार्यात आनंद मिळेल ते कार्य
केल्यास जीवन आनंदी होईल. असे विचार व्यक्त केले.
प्रा.डॉ.नितीन जाधव यांनी स्पर्धा परिक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिदद,
चिकाटी व अथक परिश्रमाची गजर असल्याचे सांगितले तर सचिन वारुळकार यांनी
शासनाच्या व विविध शासकिय अशासकिय संस्था तसेच कंपनीच्या माध्यमातून
असलेल्या रोजगारांच्या संधीची तसेच थलसेना, वायुसेना व नौसेनामध्ये
असलेल्या रोजगारांची माहिती दिली.

मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व
वंदन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
नेहरु युवा केंद्राचे अजयसिग राजपूत यांनी केले. संचलन धनंजय गावंडे
यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अविनाश गेडाम यांनी केले. कार्यक्रमासाठी
बहूसंख्येने युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी
धनंजय चाफेकर, अविनाश मोरे, विजय जाधव यांनी परिश्रम घेतले.