बंधा-याच्‍या चौकशीच्‍या मागणीसाठी रस्‍तारोकाे


संगमनेर/प्रतिनिधी - जोर्वे येथील प्रवरा नदीपात्रात असलेल्‍या बेकायदेशीर बंधा-यात साठलेल्‍या पाण्‍याची चौकशी व्‍हावी, शेती आणि पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी निळवंडे धरणातुन तातडीने आवर्तन सोडावे आणि तालुक्‍यातील इतरही गांवामध्‍येनिर्माण झालेल्‍या पाणी प्रश्‍नाचे गांभिर्य लक्षात घेवून प्रशासनाने उपाययोजना कराव्‍यात अशा मागण्‍यांसाठी तालुक्‍यातील विविध गावांमधील शेतकरी, युवक कार्यकर्ते आणि महिलांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखुन धरला. डोक्‍यावर हंडे आणि घोषणांचे फलक घेवून आंदोलनकर्त्‍यांनी पाणी प्रश्‍नांचे गांभिर्य प्रशासनाच्‍या निदर्शनास आणुन देतानाच तालुक्‍यातील सत्‍ताधारी नेतृत्‍वाने ३५ वर्षे पाणी प्रश्‍नाकडे केलेल्‍या दुर्लक्षाचे वाभाडेही काढले.


शहरातील पुणे नाशिक महामार्गावर शिवाजी पुतळ्या समोर आंदोलनकर्त्‍यांनी ठिया आंदोलन केले. आंदोलनक‍र्त्‍यांनी प्रामुख्‍याने तालुक्‍यात विविध गावांत भेडसावणा-या पाणी प्रश्‍नावर आपली आक्रमक भुमिका मांडली.पाण्‍याच्‍या प्रश्‍नासाठी या तालुक्‍याचे नेतृत्‍व करणा-या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाण्‍यासाठी आश्‍वासने दिली पण कुठल्‍याही गावामध्‍ये शेती आणि पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी शाश्‍वत पाणीपुरवठा होत नसल्‍यानेगावोगावी समस्‍या बिकट झाली असल्‍याच्‍या व्‍यथा मांडल्‍या.

याप्रसंगी बोलताना साहेबराव नवले यांनी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विखे पाटलांना सरडे म्‍हणणा-यांनी प्रथम आपले रंग तपासावेत अशी खरमरीत टिका त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजना सक्षमपणे सुरु असतात, मग संगमनेर तालुक्‍यातील पाणी पुरवठा आणि उपसा सिंचन योजना बंद कशा पडतात? असा प्रश्‍न करुन तालुक्‍यातील पश्चिम भागही पाण्‍यासाठी ओरडत आहे.समन्‍यायी पाणीवाटप कायद्याला यांनीच पाठींबा दिला. गावोगावी जेव्‍हा विरोध करण्‍याची वेळ आली तेव्‍हा ग्रामपंचायतींनी केलेले ठराव यांनीच फाडुन टाकले. तालुक्‍यापेक्षा येथील लोकप्रतिनिधींना मराठवाड्याचीकाळजी अधिक होती. आज मंजुर करुन न आणलेल्‍या कामांचे श्रेय घ्‍यायला हे पुढे जात आहेत. असे यावेळी नवले म्हणाले.

या आंदोलनात डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन कैलासराव तांबे, भगवानराव इलग, वसंतराव देशमुख, जि.प सदस्‍या अॅड.रोहीणी निघुते, महिला कॉंग्रेसच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा कांचनताई मांढरे, पं.ससदस्‍य निवृती सांगळे, शंकर माळी, सचिन शिंदे आदिंसह युवक कार्य‍कर्ते, महिला आणि नागरीक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. तहसिलदार अमोल निकम व नायब तहसिलदार सुभाष कदम यांना आंदोलनकर्त्‍यांनीनिवेदन सादर केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget