Breaking News

महापालिकेच्या सभागृहनेते पदी स्वप्नील शिंदे यांची नियुक्ती


अहमदनगर /प्रतिनिधी : अहमदनगर महापालिकेच्या सभागृहनेते पदी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि.4) दुपारी उशिरा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शिंदे यांना निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, अविनाश घुले, रविंद्र बारस्कर, सुवेंद्र गांधी, अजिंक्य बोरकर, विलास ताठे,सुमित कुलकर्णी, दादासाहेब दरेकर, राजू हरबा, प्रशांत मुथा, अजय ढोणे, गजेंद्र भांडवलकर, निलेश सत्रे, अमित गटणे, निलेश बुरा आदी उपस्थित होते.