Breaking News

सोशल नेटवर्किंगचा वापर जबाबदारीने करावा - मंदार जावळे


भाविनिमगाव/वार्ताहर: आज सोशल नेटवर्किंगचे जाळे पसरले असून त्याचा उपयोग फक्त करमणूक म्हणून न करता ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणूनही करावा. अवैध घटना व वाद विवादाला खत पाणी न घालता सोशलनेटवर्किंगचा वापर चांगल्या सामाजिक कार्यासाठी जबाबदारीने करावा . असे प्रतिपादन पोलिस उपाधिक्षक मंदार जावळे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे पोलिस दुरक्षेत्राचे उद्घाटन पोलिस उपाधिक्षक मंदार जावळे व पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनामार्गदर्शन करताना जावळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास सरपंच अलकाबाई शिंदे, बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, अण्णासाहेब शिंदे, मिलिंदकुलकर्णी, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव,रावसाहेब मरकड,संभाजी गवळी आदी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून काही कारणास्तव शहरटाकळी येथील पोलिस दुरक्षेत्र बंद होते. परंतु परिसरातील वाढत्या अवैध घटनेमुळे ते पुन्हा चालू करावे अशी मागणी नागरिकांनी केलीहोती. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी केलेली मागणी व बाजार समितीचे सभापती अॅड अनिल मडके यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीचा विचार करून शेवगाव पोलिस निरीक्षक रामराव ढिकलेयांनी दूरक्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरटाकळी ग्रामपंचायतने स्वमालकीच्या इमारतीत यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.