Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलने रुग्णसेवेची सातत्यता सांभाळली- कर्नल आनंद स्वरुप


अहमदनगर/प्रतिनिधी : आचार्य आनंदऋषीजी महाराजांचे गरजू व गरीब रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी व त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या परिवारात नवचैतन्य निर्माण व्हावे, आनंदाची निर्मिती व्हावी, असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून जैन सोशल फेडरेशनच्यावतीने होत आहे. देश परदेशातील वैद्यकीय सेवेतील अद्यावत सेवा सुविधा या हॉस्पिटलने उपलब्ध केल्या असून, जिल्ह्यात सर्वात अग्रगण्य असलेले व अत्यल्प दरामध्ये ही सेवा देण्याचे मोठे पुण्याकर्माचे काम या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन माजी सैनिक कर्मचारी अधिकारी (ईसीएचएस)चे कर्नल आनंद स्वरुप यांनी केले.

आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्ताने आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व.माणकचंद भटेवडा व स्व.राजेंद्रकुमार भटेवडा यांच्या स्मरणार्थ मनोज भटेवडा परिवाराच्यावतीने आयोजित मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व चिकित्सा शिबीराचे उद् घाटन ईसीएचएसचे कर्नल आनंद स्वरुप यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बीएसएनएलचे जनरल मॅनेजर अजातशत्रू सोमाणी, ईसीएचएसचे सिनिअर मेडिकल ऑफिसर डॉ.सतीश अडचित्ते, मनोज भडेवडा, कंचन भडेवडा, श्रीमती बिजाबाई राका, मदनबाई भटेवडा, मिनाबाई भटेवडा, स्वाती भटेवडा, अभय भटेवडा, आदेश भडेवडा, मनोज भटेवडा, हर्ष भटेवडा आदी उपस्थित होते.