Breaking News

कर थकवलेल्या मालमत्तांचे पाणी बंद


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिका हद्दीतील कर थकलेल्या मालमत्ता धारकांचे नळ जोडणी बंद करून पाणी पुरवठा थांबविण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने मार्च अखेर असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांवर हि कारवाई करण्यात आली आहे. 

शहरातील हसनखान हमजेखान, मनोज शिवाजी दिघे, वेणूबाई मारुती नाठे, दत्तात्रय दामोदर काळे, शांताराम सहादु खरात यांच्यावर पालिकेने कारवाई करत नळ जोडणी बंद करण्यात आली आहे. पुढील काळात नगरपालिकेकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे, त्यामुळे मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी आपला कर त्वरित भरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. नगरपरिषद कर अधिकारी योगेश मुळे, कर निरीक्षक रवींद्र पाठक, आनंद गाडे, राजेंद्र पांडे, सयाजी काठे, दामोदर पुंड, बळीराम बिल्लाडे, मछिंद्र काठे, गंगाराम मंडले आदींनी कारवाई यशस्वी पार पाडली.