विहेतील पंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष


पाटण / प्रतिनिधी : तालुक्यातील विहे गावात 24 मार्च रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीसाठी दोन्ही पारंपरिक गटात चुरशीच्या निवडणुकीचे वातावरण तयार झाले असुन थेट जनतेतुन निवडून येणारा सरपंच कोण? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

विहे गावच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटांतर्गत दुफळी निर्माण झाल्याने यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतराच्या दिशेने वारे वाहू लागले आहे. या पंचायतीत आमदार शंभुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांची ताकद पणाला लागली आहे असून सत्तांतरासाठी राष्ट्रवादीचा गट आक्रमक झाला आहे.

विहे पंचायतीत 11 सदस्यांच्या जागेसाठी सरळ दुरंगी लढत होत आहे. थेट जनतेतुन सरपंचपदाची निवणुक होत असल्याने आणि सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत असले तरी त्याचा फायदा खर्‍याखुर्‍या ओबीसी उमेदवारांना मिळणे अपेक्षीत आहे. विहे गावची मतदार संख्या 2800 असून जुने व नविन विहेमध्ये एकूण चार वॉर्ड आहेत. गेली अनेक वर्षे आमदार शंभुराज देसाई गटाची या पंचायतीत सत्ता आहे. मात्र गेल्या कार्यकारीणीच्या शेवटच्या चार महिन्यांत विद्यमान सरपंचांना आपल्याच गटाकडून

अविश्वसाच्या ठरावास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांनी लगेच राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने एकूणच गावातील राजकीय समीकरणेच एकदम बदलून गेली आहेत. राष्ट्रवादीची सुत्रे माजी उपसरपंचाकडे असून देसाई गटाची सुत्रे वरीष्ठ पातळीवरुन हालत आहेत. अनेक वर्ष देसाई गटाची सत्ता असल्याने आणि अंतर्गत कुरघोड्याना कंटाळलेले मतदार सत्तांतराच्या पवित्र्यात असल्याचे प्राथमिक पाहणीजा निष्कर्ष सांगितला जात आहे. ऐन उन्हाळ्यात लोकसभेच्या एक महीनाअगोदर विहे ग्रामपंचायत निवडणुक पाटण तालुक्यातील राजकीय विषय चर्चेला घेतला जातोय. आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेल्या विहे गावात योग्य, प्रामाणीक नेतृत्त्व आणि कुशल मार्गदर्शकाची कमतरता असल्याने तसेच घरटी एक एक पुढारी झाल्याने तालुक्याच्या राजकारणात या गावचा वचक कमी झाला आहे.

त्याचा फायदा कोणाला होणार हे जरी स्पष्ट नसले तरी देसाई गटांतर्गत दुफळीमुळे मतांची विभागणी झाल्याने मतदान व निकालाकडे सर्वांचेचलक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget