Breaking News

राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला


बीड : राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. बजरंग सोनावणे यांची पत्नी सारिका सोनावणे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. मात्र त्यांच्यावरचा हल्ला सरपंचाने अडवल्याने सरपंच या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णाालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. बीड येथील धर्माळा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा प्रचार सुरु होता. त्या, दरम्यान त्यांच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला चढवण्यात आला. या घटनेमध्ये सरपंच जखमी झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मी सुखरूप आहे. या कठीण प्रसंगी माझ्या व आपले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी असलेल्या बीड जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील लोकशाहीवादी नागरिकांचे आभार. मात्र, आपण कोणीही काळजी करू नका मी सुखरुप आहे. आपणा सर्वांची साथ आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तिच्या विरोधात आवाज उठवत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील, असे बजरंग सोनावणे यांच्या पत्नीने म्हटले आहे.