जम्मूत हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर


जम्मू : जम्मूच्या बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हातबॉम्ब फेकण्यासाठी त्याला 50 हजार रुपये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आले होते. त्याने हे मान्य केले. या मुलाने अजून वयाची 16 वर्षेही पूर्ण केलेली नाहीत.

या घटनेनंतर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हा परिसर खाली करण्यात आला असून सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत. पोलिसांनी या मुलाचे आधार कार्ड, इतर कागदपत्रे, शाळेतली कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यात त्याची जन्मतारीख 12 मार्च 2003 असल्याचे उघड झाले आहे. पोलिस आता या मुलाची वयनिश्‍चिती चाचणी करणार आहेत. कुलगामधला ‘हिज्बुल’चा स्थानिक म्होरक्या फय्याजने या मुलाकडे हातबॉम्ब दिला होता. जम्मूच्या बस स्थानकात झालेल्या या हल्ल्यात दोन जण ठार तर 32 जण जखमी झाले. अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या सौम्य शिक्षांमुळे दहशतवाद्यांनी आता दहशत पसरवण्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरल्याचे यातून उघड होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget