Breaking News

भाजपने उमेदवारी दिल्यास माढातून लढण्यास तयार : विजयसिंह मोहिते पाटील


सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित निंबाळकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. पण अद्याप भाजपाला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. उमेदवारी कोणाला द्यावी यावरून मोठा खल सुरू आहे. दरम्यान, विजयसिंह मोहिते यांनी अद्याप राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी त्यांना भाजपाने तिकीट दिल्यास उभारणार का असा सवाल केला असता. त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.

देशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला तरी, भाजपाकडून माढ्यातील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. भाजपकडून आज माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मागे पडलं असून, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची भाजपामध्ये या आधीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपामध्ये प्रवेश न केलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माढ्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी माघार घेतली. आणि माढ्याचा तिढा वाढला. या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती. मात्र त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विजयसिंह माढा येथे माजी आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारीची ऑफर आली तर जाल का? असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी हसत उत्तर दिले की, ‘रणजितदादा ऑलरेडी भाजपात पुढे गेले आहेत. त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर मी तयार आहे.’ यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, भाजप प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, रवींद्र ननवरे, गुरुराज कानडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून संजय शिंदे निवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे अजून निश्‍चित झालेले नाही. सध्या या जागेवर भाजपकडून रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्‍चित करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र, विजयसिंह यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे पुन्हा राजकीय भुकंप होऊ शकतो. त्यामुळे रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करुन माढातून निवडणूक लढवू शकतात.

मोहिते-पाटील पुता-पुत्रांपैकी एकाला संधी?

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा सस्पेंस आज संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील या पिता-पुत्रांना कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने मोहिते-पाटलांना मैदानात उतरविले तर माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणारराष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून माढ्याचे संजय शिंदे यांना ओळखले जाते. विरोधासाठी विरोधाचं राजकारण म्हणून भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर शिंदे यांची माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारीही दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणाला उतरवायचे याची चर्चा भाजपात सुरु होती.