Breaking News

तळमावलेच्या व्यापार्‍यांची जखमी जवानाला मदत


ढेबेवाडी / प्रतिनिधी ः काश्मीर खोर्‍यातील पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रूई (ता. कोरेगाव) येथील जवान सुशांत वीर यांना तळमावले (ता.पाटण) येथील व्यापाऱयांनी हजार रूपयांची मदत प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केली.पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर तळमावले येथील व्यापारी संघटनेने बैठक घेवून या घटनेचा निषेध करून हुतात्मा जवानांना आभिवादन केले. दहशतवाद्यांचा निषेध करण्यासाठी गाव व बाजारपेठेतून फेरीही काढण्यात आली. 

या हल्ल्‌यात जखमी झालेले सातारा जिल्ह्यातील रूईचे सुपूत्र सुशांत वीर यांना मदत करण्यासाठी व्यापारी संघटनेने केलेल्या आवाहनाला व्यापाऱयांनी उस्फूर्त प्रतिसाद देत हजार रूपयांची मदत जमा केली.काल सायंकाळी एकसळ येथे आयोजित एका कार्यक्रमास सुशांत वीर कुटूंबियांसह उपस्थित होते.तळमावले व्यापारी संघटनेच्या प्रतिनीधींनी कार्यक्रमस्थळी जावून त्यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. ग्रामीण भागातील बाजारपेठेतून जवानांसाठी उस्फूर्तपणे आलेल्या या मदतीचे कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी कौतुक करून भारतीय जवानांशी जोडलेल्या प्रेम, आदर व अभिमानाच्या या दृढ धाग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.