Breaking News

विकासकामांतूनच जनतेचा विश्‍वास संपादन : आ. कर्डिले


अहमदनगर /प्रतिनिधी : “ आपण गेली 25 वर्षे सातत्याने मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत आहोत. प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास विकासाचे प्रश्‍न बाजूला राहतात, याची जाणीव असल्याने आपण विकासाचेच राजकारण आजपर्यंत केले. त्यामुळेच शासनाच्या विविध योजना मतदार संघातील प्रत्येक गावपातळीवर पोहोचविता आल्या. विकासकामांतूनच जनतेचा विश्‍वास संपादन केल्याने जनता आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे’’, असे प्रतिपादन आ.शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड येथे आ.कर्डिले यांच्या प्रयत्नातून सुमारे 4 कोटी 50 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

तेे पुढे म्हणाले, “जिल्ह्यात राळेगण, हिवरेबाजार पाठोपाठ मांजरसुंबा गावाने लौकिक प्राप्त केला आहे, गावाच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले असून लवकरच केंद्रीय पर्यटन मंत्री जयकुमार रावल गावास भेट देणार आहेत. पर्यटन विकासाबाबत केलेल्या कामांमुळे मांजरसुंबा गाव हे पर्यटन केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे.’’
यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, अक्षय कर्डिले, सरपंच जालिंदर कदम, दिलीप भालसिंग, सुभाष झिने, कानिफनाथ कासार, कैलास पटारे, विश्‍वनाथ गुंड, जगन्नाथ मगर, संभाजी पवार, रावसाहेब बनकर, सावळेराम वाघुले, बाबासाहेब झिने, आदिनाथ मते, अण्णासाहेब पटारे, बबन पटारे, रभाजी सूळ, विठ्ठल घोरपडे, तुकाराम कदम, बाबासाहेब गायकवाड, गोरक्ष झिने, शंकर कदम, गोरक्षनाथ कदम, भास्कर कदम, कारभारी कदम, नारायण कदम, आसाराम कदम, मारुती कदम, जयराम कदम, पांडुरंग कदम, आसाराम झिने, अजय गुंड, भीमराज आढाव, बाळासाहेब झिने, रावसाहेब बनकर, सागर गुंड, अजय भूतकर आदी उपस्थित होते.